मराठवाड्यातील जिल्ह्यांत ढगांच्या दाटीत हलका पाऊस

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत ढगांच्या दाटीत हलका पाऊस
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत ढगांच्या दाटीत हलका पाऊस

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत ढगांची गर्दी आहे. मात्र, त्या तुलनेत जोरदार पाऊस येत नसल्याची स्थिती आहे. या पाचही जिल्ह्यांत गुरुवार (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६४ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यांत मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. सोयगाव मंडळात २६ मिलिमीटर, सावलदबारा ३८, वेरूळ २५, सुलतानपूर १०, बाजारसावंगी १३, बनोटी १७, अजिंठा ३२, अंबाई २७, तर गोळेगावात २८ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४८ मंडळांत पावसाची हजेरी लागली. धावडा मंडळात २७ मिलिमीटर, अनवा २०, परतूर २५, आष्टी २४, श्रीष्टी ३०, वडीगोद्री २२, गोंदी १६, सुखापुरी १५, घनसावंगी १९, तर कुंभार पिंपळगावात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परतूर, घनसावंगी, अंबड तालुक्‍यांतील काही मंडळांत मध्यम पाऊस झाला. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३२ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. माजलगाव तालुक्‍यासह परळी तालुक्‍यातील दोन, गेवराई तालुक्‍यातील दोन, व वडवणी तालुक्‍यातील एका मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली. जातेगाव मंडळात २८ मिलिमीटर, तलवाडा २५, कौडगाव बु. ३०, माजलगाव ३०, गंगामसला २५, दिंद्रूड २४, नित्रुड १४, तालखेड ३४, कि. आडगाव २५, परळी ३१, सिरसाळा २२, नागापूर १५, तर पिंपळगाव गाढे येथे १७ मिलिमीटर पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ३८ मंडळांत पावसाची हजेरी लागली. यामध्ये कासारशिरसी मंडळात २८ मिलिमीटर, औराद श. १७, अहमदपूर ३२, खंडाळी ३९, अंधोरी ५४, तर जळकोटमध्ये ३६ मिलिमीटर पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३४ मंडळांत पाऊस झाला. लोहारा, तुळजापूर, उमरगा तालुक्‍यांत पावसाचा जोर राहिला. उर्वरित तालुक्‍यांतील मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. तुळजापूर मंडळात २० मिलिमीटर, सावरगाव २२, जळकोट २२, नळदुर्ग १९, सालगरा २७, उमरगा २५, नारगवाडी २१, मुरूम १६, मुळज १७, डाळिंब २९, लोहारा ३२, माकणी २१, तर जेवळीत २३ मिलिमीटर पाऊस झाला.

७२ टक्‍केच पाऊस मराठवाड्यात १ जुन ते ८ ऑगस्टदरम्यान पावसाची सरासरी टक्केवारी ३९४.६३ मिलिमीटर आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत आजवर केवळ २८६.३० मिलिमीटर पाऊस झाला. अर्थात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ७२.५ टक्‍केच पाऊस झाला. रंगाबाद जिल्ह्यात ८७.३ टक्‍के, जालना ७२.७ टक्‍के, परभणीमध्ये  ६८.४ टक्‍के, हिंगोलीत ७५.५ टक्‍के, नांदेडमध्ये ८९ टक्‍के, बीडमध्ये केवळ ४८.३ टक्‍के, लातूरमध्ये ६४.६ टक्‍के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६६.४ टक्‍केच पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com