वऱ्हाडात बहुतांश भागांत संततधार

अकोला ः मागील २४ तासांत वऱ्हाडात सर्वत्र पावसाने ठाण मांडले आहे. बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस होत आहे. पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.
light rain continue in Varhad
light rain continue in Varhad

अकोला ः मागील २४ तासांत वऱ्हाडात सर्वत्र पावसाने ठाण मांडले आहे. बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस होत आहे. पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.

मागील काही दिवसांत पावसाने सलग हजेरी लावली आहे. आणखी दोन दिवस पाऊस ठाण मांडून राहण्याचा या भागासाठी इशारा देण्यात आला आहे. पावसामध्ये जोर नसला तरी संततधार सुरु आहे. त्यामुळे त्याचा जनजीवनावर विस्कळित परिणाम झालेला दिसून येत आहे.

बुधवारी (ता.२१) सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यात सरासरी १०.८ मि.मी पाऊस नोंदविण्यात आला.  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा तालुक्यात १५ मि.मीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर अकोल्यातही १०.८ मि.मी पावसाची नोंद झाली.

मूर्तीजापूरमध्ये १४.४ मि.मी पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यातही सर्वत्र पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने रिसोड, वाशीम तालुक्यात पावसाचा जोर होता. रिसोडमध्ये १२.८, वाशीम १०.८, मानोरा ११.२, कारंजा १०.७ मि.मी पावसाची नोंद झाली.  

  बुलडाण्यात पिकांना जीवदान 

बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी बऱ्याच तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातही गुरुवारी (ता.२२) पाऊस जोराचा होऊ शकतो, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com