agriculture news in marathi light rain continue in Varhad | Agrowon

वऱ्हाडात बहुतांश भागांत संततधार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

अकोला ः मागील २४ तासांत वऱ्हाडात सर्वत्र पावसाने ठाण मांडले आहे. बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस होत आहे. पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.

अकोला ः मागील २४ तासांत वऱ्हाडात सर्वत्र पावसाने ठाण मांडले आहे. बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस होत आहे. पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.

मागील काही दिवसांत पावसाने सलग हजेरी लावली आहे. आणखी दोन दिवस पाऊस ठाण मांडून राहण्याचा या भागासाठी इशारा देण्यात आला आहे. पावसामध्ये जोर नसला तरी संततधार सुरु आहे. त्यामुळे त्याचा जनजीवनावर विस्कळित परिणाम झालेला दिसून येत आहे.

बुधवारी (ता.२१) सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यात सरासरी १०.८ मि.मी पाऊस नोंदविण्यात आला. 
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा तालुक्यात १५ मि.मीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर अकोल्यातही १०.८ मि.मी पावसाची नोंद झाली.

मूर्तीजापूरमध्ये १४.४ मि.मी पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यातही सर्वत्र पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने रिसोड, वाशीम तालुक्यात पावसाचा जोर होता. रिसोडमध्ये १२.८, वाशीम १०.८, मानोरा ११.२, कारंजा १०.७ मि.मी पावसाची नोंद झाली.  

  बुलडाण्यात पिकांना जीवदान 

बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी बऱ्याच तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातही गुरुवारी (ता.२२) पाऊस जोराचा होऊ शकतो, असा अंदाज आहे.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...