मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत हलका पाऊस

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत हलका पाऊस
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत हलका पाऊस

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ८३ मंडळांत शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत हलका पाऊस झाला. आकाशात ढगांनी मोठी गर्दी केली. मात्र त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. शिवाय शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत आकाशात ढगांची गर्दी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ३५ मंडळांत शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक ते हलका पाऊस झाला. सोयगाव तालुक्‍यातील तीन, कन्नड, पैठणमधील प्रत्येकी एक, सिल्लोडमधील दोन मंडळांत १० ते १७ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. हे वगळता वगळता इतर मंडळांत १ ते ९ मिलिमीटरदरम्यान पावसाने हजेरी लावली.

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २८ मंडळांतदेखील  तुरळक पाऊस झाला. त्यामध्ये जाफ्राबाद तालुक्‍यातील चार, परतूरमधील दोन, भोकरदन, जालनामधील प्रत्येकी एक मंडळात १० ते १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय उर्वरित मंडळांत १ ते ९ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यातील बारा मंडळांत १ ते १० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील दोन मंडळांत तुरळक पावसाची नोंद झाली. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा मंडळांत तुरळक पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com