Agriculture news in Marathi, Light rain forecast for the state | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पुणे : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २९) पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  

पुणे : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २९) पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  

मंगळवारी (ता. २७) सकाळपासून ढगाळ हवमान आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मध्य भारतातील कमी दाबचे क्षेत्र विरून गेल्यानंतर, गुरुवारपर्यंत (ता. २९) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या फालोदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. ही प्रणाली पूरक ठरल्याने कोकणसह, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : श्रीवर्धन, म्हसळा प्रत्येकी २०, देवगड, पोलदपूर, दापोली, वाकवली, चिपळूण प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : भुसावळ, यावळ प्रत्येकी ९०, मुक्ताईनगर, धारगाव, बोधवड प्रत्येकी ६०, रावेर, शिरपूर, अक्रणी, जामनेर प्रत्येकी ५०, अक्कलकुवा, चोपडा प्रत्येकी ४०, शहादा, तळोदा, इगतपुरी, एरंडोल, दहीगाव प्रत्येकी ३०, गगनबावडा, नंदुरबार, पारोळा, सिंदखेडा प्रत्येकी २०, अमंळनेर, पौड, मालेगाव, नवापूर, पाचोरा प्रत्येकी १०. 

मराठवाडा : वसमत, अर्धापूर प्रत्येकी २०, सोयगाव, हिमायतनगर, धर्माबाद प्रत्येकी १०. 
विदर्भ : आमगाव ६०, पवनी ५०, गोंदिया, साकोली प्रत्येकी ४०, चिमूर, लाखणी, गोरेगाव, भिवापूर, धारणी, नागभिड, नरखेडा, प्रत्येकी ३०, तिरोडा, पातूर, उमरेड, कुही, तेल्हारा, भामरागड, अहेरी, सडकअर्जुनी, चिखलदरा, काटोल, देवरी, सालकेसा, वर्धा, बाळपूर, सिंदेवाही प्रत्येकी २०. 
घाटमाथा : शिरगाव ४०, ताम्हीणी, आंबोणे २०.


इतर ताज्या घडामोडी
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...