Agriculture News in Marathi Light rain forecast in the state | Page 3 ||| Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २०) दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ३० मिलिमीटर, कणकवली २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोल्हापूरमधील चंदगड येथे ३० मिलिमीटर, तर कागल आणि सोलापूरमधील करमाळा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस पडला. उस्मानाबाद येथेही १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  
 
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खालीच आहे. तर कोकण आणि विदर्भात कमाल तापमान अधिक असल्याचे दिसून आले आहे. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, महाबळेश्‍वर येथे नीचांकी १७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे ३०.३ (२२), नगर २९.९ (-), जळगाव ३५.० (२२.५), कोल्हापूर २७.७ (२१.९), महाबळेश्‍वर २२.६ (१७.९), मालेगाव ३०.२ (२३), नाशिक २९.२ (२२.३), निफाड ३०.१ (१९.२), सांगली २८.३ (२१.८), सातारा २९.९ (२३.२), सोलापूर - (२१.७), सांताक्रूझ ३४.७ (२७), डहाणू ३२.१ (२६.४), रत्नागिरी ३४.७ (२४.४), औरंगाबाद ३० (२१.७), नांदेड २८.८ (२२.८), परभणी ३०.९ (२३), अकोला ३२.५ (२३.१), अमरावती ३२ (१९.५), ब्रह्मपुरी ३५.८ (२३.३), बुलडाणा ३० (२१.७), चंद्रपूर ३२.२ (२४.२), गडचिरोली ३२.४ (१९), गोंदिया ३०.८ (२१.५), नागपूर ३१.६ (२२.४), वर्धा ३२.२ (२२.९), वाशीम ३३ (-), यवतमाळ ३२.५ 
(२१.५).

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र कायम
अरबी समुद्रात पूर्वमध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीपासून महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...