agriculture news in marathi light rain in Khandesh | Agrowon

खानदेशात भिज पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

जळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता.२७) जळगाव, धुळ्यात काही तास भिज पाऊसदेखील झाला. नवीन पेरणीसह पूर्वहंगामी कापूस पीक, केळी, भाजीपाला, उसासाठी हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. 

जळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता.२७) जळगाव, धुळ्यात काही तास भिज पाऊसदेखील झाला. नवीन पेरणीसह पूर्वहंगामी कापूस पीक, केळी, भाजीपाला, उसासाठी हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. 

गेल्या वर्षी खानदेशात सर्वत्र ७० टक्क्यांवर पाऊस जुलैच्या २० तारखेपर्यंत झाला होता. धुळ्यातील पाऊसमान सर्वाधिक होते. जळगाव जिल्ह्यात १५० टक्क्यांवर पाऊस झाला होता. यंदा मात्र पाऊसमान जूनमध्ये अत्यल्प होते. नंदुरबारात गेल्या पाच दिवसातच पाऊस झाला आहे. जून व जुलैच्या मध्यातही नंदुरबारात पाऊस नव्हता. तेथे कापूस, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मुगाची पेरणी अपेक्षित क्षेत्रात होवू शकलेली नाही. पण तेथेही गेले पाच दिवस अधून-मधून चांगला पाऊस झाला आहे.

नंदुरबारात कमी पाऊसमान होते. पण तळोदा, शहादा भागात चांगला पाऊस झाला. धुळ्यात शिंदखेडा तालुक्यात कमी पाऊस झाला. गेले तीन-चार दिवस धुळ्यातील साक्री, धुळे, शिरपूर, जळगावमधील धरणगाव, एरंडोल, जळगाव, भुसावळ, यावल, पाचोरा, चोपडा या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. जळगाव तालुक्यात मंगळवारी २८ मिलीमीटर पाऊस पडला. एरंडोलातही चांगला पाऊस झाला. 

जळगाव जिल्ह्यात ६३ टक्के पाऊस झाला आहे. यात चाळीसगाव, पाचोरा भागात चांगला पाऊस झाला. पण जळगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा भागात कमी पाऊसमान आहे. धुळ्यातही ५० टक्क्यांवर पाऊस झाला. नंदुरबारातील पाऊसही ५० टक्क्यांपर्यंत झाला आहे. गेल्या २४ तासात कुठेही अतिवृष्टी झालेली नसल्याची माहिती मिळाली. भिज पावसामुळे जमिनीतही पाणी जिरण्यास मदत झाली आहे.

जमीन खरडणे, माती वाहून जाणे, पिकांची हानी, असे प्रकारही गेल्या पाच-सहा दिवसातील पावसात अपवाद वगळता झालेले नाहीत. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढू शकणार आहे. नदी, नाल्यांना अद्याप चांगले प्रवाही पाणी आलेले नाही. गिरणा, पांझरा, गोमाई, सुसरी, अनेर आदी नद्यांना पूर आलेला नाही. फक्त तापी नदीला तीनदा चांगला पूर आला. तापी नदीवरील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक कायम आहे. 

पाऊस (मिलीमीटरमध्ये) ः जळगाव - चोपडा २१, यावल १८, भुसावळ २२, जळगाव २८, एरंडोल ३१. धुळे - शिंदखेडा १८, साक्री २६.


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...