agriculture news in marathi, Light rain in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात हलका पाऊस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे  : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. २५) दुपारनंतर जिल्ह्यात हलक्या पावसाला सुरवात झाली. शुक्रवारी (ता. २६) सकाळपासून ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरूच राहिली. गेले काही दिवस उघडीप असलेल्या धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे.   

पुणे  : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. २५) दुपारनंतर जिल्ह्यात हलक्या पावसाला सुरवात झाली. शुक्रवारी (ता. २६) सकाळपासून ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरूच राहिली. गेले काही दिवस उघडीप असलेल्या धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे.   

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर तालुक्यांमध्ये आलेल्या पावसाने भात पिकासह सर्वच खरिपाच्या पिकांना फायदा होणार आहे. पूर्व भागातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे.

 घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाल्याने झरे, ओहळ पुन्हा प्रवाहित झाले आहेत. मात्र धरणांचा पाणीसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. सोमवारी (ता. ८) खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून सुमारे १५.१६ टीएमसी (५२ टक्के) पाणीसाठा झाला होता. पावसाने आठवडाभर उघडीप दिल्याने खडकवासला धरणाचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.

वरसगाव आणि टेमघर धरणात अद्यापही ५० टक्के पाणीसाठा झालेला नाही. शुक्रवारी (ता.२ ६) सकाळपर्यंत सर्वच धरणांच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. डिंभे धरण क्षेत्रात ३८ मिलिमीटर, कळमोडी ७७, चासकमान ३९, वडीवळे ५९, मुळशी ४१, टेमघर ४४, वरसगाव ३२, नीरा देवघर धरण क्षेत्रात ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


इतर बातम्या
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...