पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील हवेली, भोर, मावळ, वेल्हे, खेड, आंबेगाव तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी तर जुन्नर, बारामती, पुरंदर तालुक्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान होते तसेच उकाड्यातही वाढ झाली.

आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, कळंब आदी गावांत मुसळधार पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने कडेवाडी-चास येथील शेंद्री ओढ्याला पुराचे पाणी आले आहे. महाळुंगे पडवळ, चास येथे पाऊस वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने उसासह वेलवर्गीय पिकांचा आधार कोसळल्याने टोमॅटो, दुधी भोपळा व अन्य पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, स्टेशन, वराळे, आंबी, एमआयडीसी, नवलाख उंबरेसह माळवाडी परिसरात गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर तासभर जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : पुणे शहर १२, खडकवासला ६, वेळू १०, मावळ १३, काले १०, वेल्हा १९, विंझर ८, वाडा ११, कुडे २२, घोडेगाव १६, मंचर ८, पणदरे ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com