वऱ्हाडात सर्वत्र रिमझिम पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : वऱ्हाडात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसाची रिमझिम सुरूच असल्याने शेतीतील कामे ठप्प झाली अाहेत. हवामान विभागाने विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असला तरी पावसाला मात्र जोर वाढलेला नाही.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस झाला अाहे. अकोला जिल्ह्यात सरासरी ६.२,  वाशीममध्ये १६.१ अाणि बुलडाण्यात १०.८ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यात १३.६ मिमी पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यांत १३ तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झाली. त्यात मेहकरमध्ये सर्वाधिक २६.९ मिमी पाऊस झाला. प्रामुख्याने घाटावरील तालुक्यांमध्ये पावसाने जोर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट होते. बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा या घाटावरील तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी सरासरी १२ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

वाशीम जिल्ह्यांतसुद्धा सर्वदूर पावसाची रिपरीप सुरू अाहे. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात २२.३, मंगरुळपीर १८.७, वाशीम १५.२, रिसोड १७.३, मानोरा १२.७, कारंजा १०.४ मिमी पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यात बुलडाण्याच्या तुलनेत पावसाचा जोर थोडा अधिक अाहे. या पावसाचा जिल्ह्यातील पिकांना अधिक फायदा होणार अाहे. बुलडाणा जिल्ह्यात अाजवर पावसाची हजेरी जेमतेमच राहिलेली अाहे.

सलग पाऊस सुरू असल्याने काही गावांचा अपवाद वगळता शेतीतील कामे ठप्प झाली अाहेत. सध्या निंदणी, डवरणीची कामे वेगाने सुरू आहेत. पण या पावसाने ही कामे थाबंली.  सातत्याने ढगाळ व हलका पाऊस पडत असल्याने हे हवामान कपाशी, सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी बाधक ठरण्याची चिन्हे अाहेत. प्री-मॉन्सून कपाशीवर अाधीच बोंड अळीचे संकट घोंघावत अाहे.

जूनमध्ये लागवड झालेले सोयाबीन अाता दीड महिना कालावधीचे होत अाहे. या दोन्ही पिकांवर अशा हवामानाचा मोठा परिणाम होऊ शकतो. कपाशीवर मावा, तुडतुडे, अळी तर सोयाबीनवर पाने खाणारी अळी काही ठिकाणी दिसत आहे. कीड नियंत्रणासाठी फवारणीची कामे सुरू झाली असली तरी अाताच्या पावसामुळे या कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com