राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात तापमानाचा पारा वर गेला आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. अधून-मधून येणारी एखादी सरीमुळे गारवा येत असला तरी त्यापाठोपाठ उकाडा आणखी वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. १९) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  हरियाना आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळू लागले आहे. तर बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. यामुळे बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहारमध्ये मंगळवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर कोकणात काही ठिकाणी, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस, तर वर्धा आणि परभणी येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापामनाची नोंद झाली. विदर्भातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेके ठिकाणी १ ते ३ अंश, तसेच कोकणच्या तापमानातही १ ते २ अंशांची वाढ झाली आहे. तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढत आहे.  रविवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.६ (१.३), नगर ३१.८ (२.८), जळगाव ३२.०(१.१), कोल्हापूर २८.५(२.२), महाबळेश्वर २०.१ (०.५), मालेगाव ३०.० (०.४), नाशिक २७.१ (-०.८), सांगली २९.३ (०.९), सातारा २८.० (१.८), सोलापूर ३३.२ (२.२), अलिबाग ३०.७ (१.३), डहाणू ३१.६ (१.५), सांताक्रूझ ३१.६ (१.८), रत्नागिरी ३०.४ (२.०), औरंगाबाद ३०.७ (१.६), बीड ३२.४ (२.४), परभणी ३३.६ (३.१), नांदेड ३२.० (०.७), उस्मानाबाद ३०.७ (१.८), अकोला ३३.१ (२.५), अमरावती ३१.२ (१.४), बुलडाणा २९.८ (२.५), ब्रह्मपुरी ३३.७ (३.९), चंद्रपूर ३३.३(२.७), नागपूर ३३.३ (२.७), वर्धा ३३.६ (३.१६), यवतमाळ ३१.०(२.१).  रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : दोडामार्ग, माथेरान, जव्हार, मंडणगड, भिवंडी, उल्हासनगर, कर्जत, खालापूर, रोहा प्रत्येकी १०.  
  • मध्य महाराष्ट्र : दहीगाव ३०, पेठ, पारोळा, इगतपुरी, अक्कलकुवा, चांदवड, लोणावळा, पौड, जामनेर, राधानगरी प्रत्येकी १०. 
  • मराठवाडा : माहूर २०, उदगीर १०. 
  • घाटमाथा : शिरगाव ४०, आंबोणे २०, दावडी, ताम्हिणी, कोयना नवजा प्रत्येकी १०.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com