agriculture news in marathi, light rainfall prediction in state | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात तापमानाचा पारा वर गेला आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. अधून-मधून येणारी एखादी सरीमुळे गारवा येत असला तरी त्यापाठोपाठ उकाडा आणखी वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. १९) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात तापमानाचा पारा वर गेला आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. अधून-मधून येणारी एखादी सरीमुळे गारवा येत असला तरी त्यापाठोपाठ उकाडा आणखी वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. १९) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

हरियाना आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळू लागले आहे. तर बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. यामुळे बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहारमध्ये मंगळवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर कोकणात काही ठिकाणी, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस, तर वर्धा आणि परभणी येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापामनाची नोंद झाली. विदर्भातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेके ठिकाणी १ ते ३ अंश, तसेच कोकणच्या तापमानातही १ ते २ अंशांची वाढ झाली आहे. तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढत आहे. 

रविवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.६ (१.३), नगर ३१.८ (२.८), जळगाव ३२.०(१.१), कोल्हापूर २८.५(२.२), महाबळेश्वर २०.१ (०.५), मालेगाव ३०.० (०.४), नाशिक २७.१ (-०.८), सांगली २९.३ (०.९), सातारा २८.० (१.८), सोलापूर ३३.२ (२.२), अलिबाग ३०.७ (१.३), डहाणू ३१.६ (१.५), सांताक्रूझ ३१.६ (१.८), रत्नागिरी ३०.४ (२.०), औरंगाबाद ३०.७ (१.६), बीड ३२.४ (२.४), परभणी ३३.६ (३.१), नांदेड ३२.० (०.७), उस्मानाबाद ३०.७ (१.८), अकोला ३३.१ (२.५), अमरावती ३१.२ (१.४), बुलडाणा २९.८ (२.५), ब्रह्मपुरी ३३.७ (३.९), चंद्रपूर ३३.३(२.७), नागपूर ३३.३ (२.७), वर्धा ३३.६ (३.१६), यवतमाळ ३१.०(२.१). 

रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : दोडामार्ग, माथेरान, जव्हार, मंडणगड, भिवंडी, उल्हासनगर, कर्जत, खालापूर, रोहा प्रत्येकी १०.  
  • मध्य महाराष्ट्र : दहीगाव ३०, पेठ, पारोळा, इगतपुरी, अक्कलकुवा, चांदवड, लोणावळा, पौड, जामनेर, राधानगरी प्रत्येकी १०. 
  • मराठवाडा : माहूर २०, उदगीर १०. 
  • घाटमाथा : शिरगाव ४०, आंबोणे २०, दावडी, ताम्हिणी, कोयना नवजा प्रत्येकी १०.

इतर बातम्या
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...