कोकण, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता

आज (ता.२३) कोकण, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकण, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता
कोकण, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनच्या पावसाने उघडीप दिली आहे. सोमवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.२३) कोकण, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   उत्तर पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पट्ट्याचा पूर्व भाग उत्तरेकडे सरकणार आहे, तर ओडिशा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर ते ७.६ किलोमीटर उंचीवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिण दिशेकडे झुकणार असल्याने मॉन्सूनची रेंगाळलेली वाटचाल सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. पूर्व आणि उत्तर भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारतातील राज्यातही पाऊस वाढणार आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग)  :   कोकण : भिरा ६१, म्हसळा ५२, पेण ३०, पोलादपूर ३०, रोहा, ३१ गुहागर ३५, अंबरनाथ ५८, कल्याण ५८, ठाणे ४५, उल्हासनगर ५८. मध्य महाराष्ट्र : गगनबावडा २०,  पेठ १४, लोणावळा कृषी १४. मराठवाडा : लातूर १२, रेणापूर ३३, शिरूर अनंतपाळ १०.  विदर्भ : अहेरी २३, भामरागड ३४, एटापल्ली २४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com