agriculture news in marathi Light showers in Khandesh; Lack of heavy rain | Agrowon

खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

जळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे. शनिवारी (ता.२४) व रविवारी (ता.२५) हलका पाऊस अनेक भागात झाला. जोरदार पाऊस कुठेही बरसला नाही. 

जळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे. शनिवारी (ता.२४) व रविवारी (ता.२५) हलका पाऊस अनेक भागात झाला. जोरदार पाऊस कुठेही बरसला नाही. 

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, रावेर, यावल, एरंडोल, भडगाव भागात पाऊसमान बरे आहे. पण जळगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, बोदवड, भुसावळ या भागात पाऊसमान कमी आहे. रविवारी सकाळपासून भिज पाऊस सुरू होता. रात्रीदेखील हलका, भुरभुर पाऊस काही भागात झाला. 

पेरणी खानदेशात पूर्ण होत आली आहे. पण नापेर क्षेत्र पाऊस लांबल्याने यंदा अधिक आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद लागवड कमी झाली आहे. पेरणी झालेल्या पिकांसह पूर्वहंगामी कापूस, केळी, ऊस आदी पिकांना चांगल्या पावसाची गरज आहे. यंदा अपवाद वगळता कुठेही एका दिवसात ६० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. 

नंदुरबारात सरासरीच्या ३० टक्केच पाऊस झाला आहे. तेथेही रविवारी काही भागात हलका पाऊस झाला. धुळ्यात साक्री वगळता शिंदखेडा, शिरपूर, धुळे भागात भिज पाऊस झाला. जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ तालुक्यात १२ मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस पडला नाही. अशीच स्थिती नंदुरबारातही होती.

नंदुरबारमधील सातपुड्याच्या क्षेत्रातील धडगाव, अक्कलकुवामधील मोलगी भागातही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. चोपडा तालुक्यात कृत्रीम पाऊस पाडण्याची मागणी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील व इतरांनी केली.


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...