पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. तरीही तुरळक ठिकाणी पावसाच्या लहक्या सरी पडत आहेत. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होताना दिसून येते.
Light showers in Pune district
Light showers in Pune district

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. तरीही तुरळक ठिकाणी पावसाच्या लहक्या सरी पडत आहेत. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होताना दिसून येते.

पावसाचे जवळपास दोन महिने लोटले आहेत. जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. जुलै महिन्यातही काही प्रमाणात अशीच स्थिती होती. मात्र, आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगल्या पावसाने सुरुवात केली. जिल्ह्याच्या पश्चिम पट्यासह पूर्व भागात पावसाची बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. काही वेळेस पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे  तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत असल्या तरी पश्चिम भागात भात लागवडीसाठी जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ओढे नाले खळाळून वाहत आहेत.

शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे ११०. मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. हवेली तालुक्यातील कोथरूड येथे २.५ मिलिमीटर पाऊस झाला असून खडकवासला, थेऊर, उरूळी कांचन, खेड, कळस येथे पावसाचा शिडकावा झाला. मुळशी तालुक्यातील कोथरूड, खेड, चिंचवड येथे येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मुळशीमधील पौड, घोटावडे, माले, मुठे, पिरंगुट येथेही पावसाची संततधार सुरू होती. भोरमधील नसरापूर येथे ४७ मिलिमीटर पाऊस पडला असून भोळावडे, किकवी, वेळू, संगमनेर, अंबावणे, निगुडघर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मावळमधील कार्ला येथे ७२ मिलिमीटर तर तळेगाव, काले, खडकाळा, शिवणे, वेल्हातील, पाणशेत, विंझर, अंबावणे, जुन्नरमधील नारायणगाव, राजूर, डिंगोरे, आपटाळे येथेही पावसाच्या तुरळक सरी पडल्या. खेडमधील वाडा, राजगुरूनगर, कुडे, पाईट, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस येथे हलका पाऊस पडला.

आंबेगावमधील घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, शिरूरमधील कोरेगाव, पाबळ, बारामतीतील वडगाव, लोणी, इंदापूरातील लोणी, दौंडमधील यवत, पाटस, केडगाव, पुरंदरमधील भिवंडी, परिंचे, वाल्हा, राजेवाडी या भागात तुरळक सरी पडल्या. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com