नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडळांत हलक्या सरी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडळांत हलक्या सरी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडळांत हलक्या सरी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडळांमध्ये शनिवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे खरिप हंगामातील पिकांना काहीप्रमाणात तात्पुरता दिलासा मिळाला.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, किनवट, मुदखेड, लोहा, माहूर, नायगाव, देगलूर, कंधार, बिलोली, धर्माबाद, भोकर तालुक्यातील ५१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील ३० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १ मंडळामध्ये पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी ) 

नांदेड जिल्हा नांदेड शहर ८, नांदेड ग्रामीण ६, तुप्पा १२, विष्णुपुरी १०, वसरणी ४, वजीबाद ८, तरोडा २४, लिंबगाव ७, मुखेड ३१,जांब २५, जाहूर २३, चांदोला ४०, मुक्रमाबाद ३२, बाऱ्हाळी २०, किनवट ३, मांडवी ३, बोधडी २, मुदखेड १, मुगट २, बारड ७, दाभड २,  लोहा १५, माऴकोळी २७, कलंबर १९, शेवडी २, सोनखेड २, कापशी १, माहूर २, वाई बाजार ५, सिंदखेड ४, नायगाव २३, नरसी २६, मांजरम २४, देगलूर ३१, खानापूर २९, शहापूर २८, मरखेल २४, मालेगाव ४५, कंधार २०, कुरुला २०, उस्माननगर ११, पेठवडज ४१, फुलवळ ३०, बारुळ ३७, बिलोली १०, आदमपूर ४०, लोहगाव २७, सगरोळी ८, कुंडलवाडी १२, भोकर १, मातुल १.
परभणी जिल्हा परभणी शहर ८, परभणी ग्रामीण ७, दैठणा ५, झरी १७,पेडगाव १३, पिंगळी ४, जांब १२, सेलू ४२, देऊळगाव ३८, कुपटा १६, वालूर ११, चिकलठाणा २, मानवत १४, केकरजवळा १६, कोल्हा ६, पाथरी १०, बाभळगाव ७, हदगाव २, पालम ९, चाटोरी १, बनवस ३, पूर्णा ७, ताडकळस २, चुडावा ८, लिमला ३, कात्नेश्वर १३, गंगाखेड ४, राणीसावरगाव ४, माखणी ५, महातपुरी ५.
हिंगोली जिल्हा हट्टा ११.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com