Agriculture news in marathi With lightning strikes Heavy rain in Sindhudurg | Agrowon

विजांच्या कडकडाटांसह  सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

जिल्ह्याच्या काही भागात रविवारी सायकांळी उशिरा विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील काही गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात रविवारी सायकांळी उशिरा विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील काही गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सतत होणाऱ्या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. रविवारी सायकांळी उशिरा वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांना पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांसह हा पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील करूळ, सडुरे, नावळेसह भुईबावडा आणि करूळ घाट परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. कणकवली तालुक्यातील फोंडा, घोणसरी, नांदगाव परिसरात चांगला पाऊस पडला. 

सतत पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील आंबा एप्रिल अखेरीस परिपक्व होण्यास सुरूवात होते. सध्या या भागातील आंबा परिपक्व होत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे या भागातील आंबा पीकच धोक्यात येणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वैभववाडी, कणकवलीसह जिल्ह्यातील देवगड, कुडाळ तालुक्याच्या काही भागात देखील पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या. 
 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...