राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. आज (ता. २५) कोकण सर्वदूर, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Lightning, thunder and rain warning in the state
Lightning, thunder and rain warning in the state

पुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. आज (ता. २५) कोकण सर्वदूर, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, अजमेर, जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम राजस्थान, आणि छत्तीसगड परिसरावर तसेच आंध्र प्रेदशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकताना ही प्रणाली आणखी ठळक होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पोषक वातावरण निर्माण झाल्याने रविवारपासून (ता. २६) पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात उद्या (ता. २५) पश्‍चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड. विदर्भ : बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) कोकण : रत्नागिरी : चिपळूण ६०, दापोली ४१, गुहागर ५४, खेड ४१, संगमेश्‍वर ४२, सिंधुदुर्ग : कणकवली ३४, वैभववाडी ३२. मध्य महाराष्ट्र : नगर : पारनेर ३५, पाथर्डी ५७, धुळे : साक्री ५१, कोल्हापूर : गगनबावडा ४५, नाशिक : गिरणा धरण ३०, सुरगाणा ५३, सोलापर : अक्कलकोट ३५, बार्शी ४६, करमाळा ३५, मोहोळ ३६. मराठवाडा : औरंगाबाद : गंगापूर ३९, कन्नड ६७, वैजापूर ६४. बीड : अंबाजोगाई ९७, आष्टी ५४, बीड ५१, धारूर ६३, केज ७९, वाडवणी ४२, हिंगोली : औंढा नागनाथ ५२, जालना : भोकरदन ३२, लातूर : औसा ३१, लातूर ४४, निलंगा ९१, उस्मानाबाद : कळंब ६०, लोहारा ४३, उस्मानाबाद ९४, उमरगा ४०, परभणी : मानवत ३०, पालम ७०, परभणी ८३, सोनपेठ ६७. विदर्भ : अमरावती : दर्यापूर ३४, भंडारा : लाखणी ३७, मोहाडी ४२, चंद्रपूर : जेवती ३२, वाशीम : मानोरा ४४, यवतमाळ : दारव्हा ४३, दिग्रस ५८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com