Agriculture news in Marathi Lightning, thunder and rain warning in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

शनिवार, 25 सप्टेंबर 2021

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. आज (ता. २५) कोकण सर्वदूर, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. आज (ता. २५) कोकण सर्वदूर, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, अजमेर, जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम राजस्थान, आणि छत्तीसगड परिसरावर तसेच आंध्र प्रेदशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत
पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकताना ही प्रणाली आणखी ठळक होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पोषक वातावरण निर्माण झाल्याने रविवारपासून (ता. २६) पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात उद्या (ता. २५) पश्‍चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड. विदर्भ : बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)
कोकण :
रत्नागिरी : चिपळूण ६०, दापोली ४१, गुहागर ५४, खेड ४१, संगमेश्‍वर ४२, सिंधुदुर्ग : कणकवली ३४, वैभववाडी ३२.
मध्य महाराष्ट्र : नगर : पारनेर ३५, पाथर्डी ५७, धुळे : साक्री ५१, कोल्हापूर : गगनबावडा ४५, नाशिक : गिरणा धरण ३०, सुरगाणा ५३, सोलापर : अक्कलकोट ३५, बार्शी ४६, करमाळा ३५, मोहोळ ३६.
मराठवाडा : औरंगाबाद : गंगापूर ३९, कन्नड ६७, वैजापूर ६४.
बीड : अंबाजोगाई ९७, आष्टी ५४, बीड ५१, धारूर ६३, केज ७९, वाडवणी ४२, हिंगोली : औंढा नागनाथ ५२, जालना : भोकरदन ३२, लातूर : औसा ३१, लातूर ४४, निलंगा ९१, उस्मानाबाद : कळंब ६०, लोहारा ४३, उस्मानाबाद ९४, उमरगा ४०, परभणी : मानवत ३०, पालम ७०, परभणी ८३, सोनपेठ ६७.
विदर्भ : अमरावती : दर्यापूर ३४, भंडारा : लाखणी ३७, मोहाडी ४२, चंद्रपूर : जेवती ३२, वाशीम : मानोरा ४४, यवतमाळ : दारव्हा ४३, दिग्रस ५८.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
पंढरपुरात पूरस्थितीसोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या...
कृषी प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी’कडेच पुणे ः कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी...
साडेतीन हजार कोटींसाठी साखर...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकविलेली...
‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारीपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...