विदर्भ, मराठवाड्यात विजा,  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 

राज्यात दोन दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे. आज (ता. ३) विदर्भ, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात विजा,  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  Lightning in Vidarbha, Marathwada, Chance of Rain with Thunderstorms
विदर्भ, मराठवाड्यात विजा,  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  Lightning in Vidarbha, Marathwada, Chance of Rain with Thunderstorms

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे. आज (ता. ३) विदर्भ, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिला आहे.  

 बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा पूर्वेकडे माघारी फिरण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या चक्राकार वाऱ्यांपासून महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.  त्यामुळे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. यातच देशाच्या वायव्य भागात ६ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)  मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.  मराठवाडा : औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर.  विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.  ‘शाहीन’ चक्रीवादळ झाले तीव्र  अरबी समुद्रातील ‘शाहीन’ चक्रीवादळ अधिक तीव्र झाले आहे. ही वादळी प्रणाली चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. उद्या (ता. ४) हे वादळ ओमानच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. २) दुपारी ही वादळी प्रणाली देवभूमी द्वारिकेच्या पश्चिमेकडे ७७० किलोमीटर, इराणच्या चाबहार बंदरापासून पूर्वेकडे तर १८० किलोमीटर तर ओमानच्या मस्कतपासून ३४० किलोमीटर अग्नेयेकडे अरबी समुद्रात होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com