किमान तापमानात घट होण्याची शक्यता

राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे.
Likely to decrease in minimum temperature
Likely to decrease in minimum temperature

पुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे. आज (ता. ७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असून, किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता. ६) गोंदिया येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)  पुणे २८.८ (१४.६), जळगाव २९.९ (१७.३), कोल्हापूर २९.३ (१७.१), महाबळेश्वर २२.६(१४.४), मालेगाव २१.० (-), नाशिक २८.८ (१६.१), निफाड २८.५ (१५.५), सांगली २८.१(१६.९), सातारा २६.२(१६.५), सोलापूर ३०.१ (१७.२), सांताक्रूझ ३२.३(२०.९), अलिबाग - (१६.८), डहाणू २९.६ (२०.२), रत्नागिरी ३२.५ (१८.२), औरंगाबाद ३०.० (१७.६), नांदेड - (१८.०), उस्मानाबाद - (१६.४), परभणी ३०.२ (१७.०), अकोला ३१.८ (१८.०), अमरावती ३०.८ (१६.३), ब्रह्मपुरी ३३.३ (१७.६), बुलडाणा ३०.२ (१७.७), चंद्रपूर २९.६ (१७.२), गडचिरोली ३०.०(१७.४), गोंदिया २९.६ (१३.४), नागपूर २९.८ (१५.३), वर्धा २९.०(१६.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.० (१५.५).

जवाद चक्रीवादळ निवळले बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ निवळले असून, सोमवारी (ता. ६) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. तर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com