Agriculture news in Marathi Likely to decrease in minimum temperature | Agrowon

किमान तापमानात घट होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे.

पुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे. आज (ता. ७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असून, किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता. ६) गोंदिया येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)  पुणे २८.८ (१४.६), जळगाव २९.९ (१७.३), कोल्हापूर २९.३ (१७.१), महाबळेश्वर २२.६(१४.४), मालेगाव २१.० (-), नाशिक २८.८ (१६.१), निफाड २८.५ (१५.५), सांगली २८.१(१६.९), सातारा २६.२(१६.५), सोलापूर ३०.१ (१७.२), सांताक्रूझ ३२.३(२०.९), अलिबाग - (१६.८), डहाणू २९.६ (२०.२), रत्नागिरी ३२.५ (१८.२), औरंगाबाद ३०.० (१७.६), नांदेड - (१८.०), उस्मानाबाद - (१६.४), परभणी ३०.२ (१७.०), अकोला ३१.८ (१८.०), अमरावती ३०.८ (१६.३), ब्रह्मपुरी ३३.३ (१७.६), बुलडाणा ३०.२ (१७.७), चंद्रपूर २९.६ (१७.२), गडचिरोली ३०.०(१७.४), गोंदिया २९.६ (१३.४), नागपूर २९.८ (१५.३), वर्धा २९.०(१६.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.० (१५.५).

जवाद चक्रीवादळ निवळले
बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ निवळले असून, सोमवारी (ता. ६) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. तर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...