agriculture news in marathi, lime gardens become in trouble due to drought, nagar, maharashtra | Agrowon

संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर 
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्‍याच्या पूर्व भागातील पिंप्री-लौकी-अजमपूर येथील सुमारे ८० हेक्‍टरवरील लिंबू बागा दुष्काळाच्या तडाख्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत. दुष्काळामुळे जळालेल्या बागांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्‍याच्या पूर्व भागातील पिंप्री-लौकी-अजमपूर येथील सुमारे ८० हेक्‍टरवरील लिंबू बागा दुष्काळाच्या तडाख्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत. दुष्काळामुळे जळालेल्या बागांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिंप्री-लौकी-अजमपूर परिसर सर्वदूरच्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये लिंबे निर्यात करण्यासाठी सुमारे ३० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. येथील एक ते पाच एकरांवर अनेकांनी लिंबू बागा केल्या आहेत. शेतकऱ्यांनी प्रसंगी टॅंकरच्या विकतच्या पाण्यावर बागा जगविल्या. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सलग कमी पावसाचा फटका बसल्याने शेकडो एकरांवरील बागा नेस्तनाबूत झाल्या. तरीही, सध्या एकट्या पिंप्री- लौकी शिवारात सुमारे ८०.२८ हेक्‍टरवर बागा आहेत. 

गतवर्षी ११२ शेतकऱ्यांनी मुंबई येथील ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे प्रत्येकी साडेपाच हजार रुपयांप्रमाणे विमाहप्ता भरला. दुष्काळामुळे जळालेल्या बागांचे पंचनामे करून संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही बागांची पाहणी व पंचनामा करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेले नाहीत. 

पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरिपातील बाजरीचे पीक जळून चालले आहे. रिमझिम पावसावर कर्जाऊ रकमा घेऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे हाल पाहण्यास कृषी अधिकाऱ्यांना सवड नाही. संबंधित कंपनीने तातडीने पंचनामे करून येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा विमा कंपनीविरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत गिते यांनी केली आहे. तसे पत्र गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...
पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या...मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़,...
कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी...रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...