टेंभू कालव्याचे अस्तरीकरण ढासळले

टेंभू योजनेच्या कालव्याचे अस्तरीकरण खरसुंडी गावाशेजारील एका वर्षात ढासळून मोठाले खड्डे पडल्याने अस्तरीकरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. पुढचा कालवा ‘पाठ’ आणि मागचा ‘सपाट’ अशी स्थिती झाल्यामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टेंभू कालव्याचे अस्तरीकरण ढासळले The lining of the Tembu canal collapsed
टेंभू कालव्याचे अस्तरीकरण ढासळले The lining of the Tembu canal collapsed

खरसुंडी, सांगली : टेंभू योजनेच्या कालव्याचे अस्तरीकरण खरसुंडी गावाशेजारील एका वर्षात ढासळून मोठाले खड्डे पडल्याने अस्तरीकरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. पुढचा कालवा ‘पाठ’ आणि मागचा ‘सपाट’ अशी स्थिती झाल्यामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरसुंडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या कामाबाबत संताप व्यक्त केला आहे.

आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातून टेंभू योजनेचा ३२ किमी कालवा जातो. या मुख्य कालव्याचे आठ वर्षांपूर्वी पूर्ण काम जलसंपदा विभागामार्फत करून पाणी सोडण्यात आले. कालव्यास पाण्याची गळती होऊ नये यासाठी दोनच वर्षांपूर्वी अस्तरीकरण काम ठेकेदारामार्फत झाले. टप्प्याटप्प्याने हे काम केले. सध्याही राहिलेले काम खरसुंडीपासून एक किमी अंतरावर सुरू आहे. 

खरसुंडी गावालगत एक किमी कालव्याच्या अस्तरीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. एकाच वर्षात दर्जाहीन काम ढासळून गेल्यामुळे शासनाचा पैसा पाण्यात गेला आहे. याच ठिकाणी पहिल्यांदा पडलेल्या खड्डयाचे परत अस्तरीकरण ठेकेदाराने दुरुस्ती केली होती.

कालव्याच्या याठिकाणी परत अस्तरीकरणाचा बराचसा भाग ढासळून मोठे खड्डे पडले आहेत. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी अंती चौकशी करून या कामांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. खरसुंडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन पुजारी, उपसरपंच सौ. सलिमा शिकलगार, सदस्य जितेंद्र पाटील यांनी कालव्याच्या ढासळलेल्या अस्तरीकरणाची पाहणी करून चांगल्या प्रतीचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ढासळले आहे. जलसंपदा विभागाने लक्ष दिले असते तर काम चांगल्या प्रतीचे होऊन दुरुस्ती करण्याची वेळ आली नसती. - अर्जुन पुजारी, माजी सरपंच 

प्रतिक्रिया

कालव्याचे अस्तरीकरण काम चांगल्या दर्जाचे झाले, तर बरेच वर्षे याचा फायदा जल संपदा विभाग व शेतकऱ्यांना झाला असता. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाच्या पैशाचा दुरुपयोग होत असतो. निकृष्ट कामामुळेच कालव्याची स्थिती अशी झाली आहे. - सौ. सलिमा शिकलगार, उपसरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com