रत्नागिरीत सौर कृषिपंपाच्या नोंदणीसाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध

रत्नागिरीत सौर कृषिपंपाच्या नोंदणीसाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध
रत्नागिरीत सौर कृषिपंपाच्या नोंदणीसाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध

रत्नागिरी : कोकणात सौर कृषिपंप योजनेला प्रतिसाद मिळण्यासाठी आता या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे या योजनेच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

विजेच्या समस्या आणि वीजबचतीसाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी करावा लागणारे कृषिपंप सौरऊर्जेवर चालवण्यात येणार आहेत. मात्र, या योजनेला कोकणात अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. ही योजना सौरऊर्जेवर चालविताना वातावरणाची अनुकूलता लक्षात घेऊन त्यांना वीजपुरवठा देण्याचा पर्यायही ठेवण्यात येणार आहे.  उपलब्धतेनुसार योजना सौरऊर्जेवर चालविण्यात आल्यास मोठी वीजबचत होणार आहे.

या योजनांमुळे वीज उपलब्ध नसतानाही पुरवठा सुरळीत राहील. यासाठी शेतकऱ्यांना सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे ही योजना ऑनलाइन झाली आहे. संकेतस्थळावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबतची कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या शिवाय सौर कृषिपंप योजनेची संपूर्ण माहिती, मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यःस्थिती तपासण्यासह मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हिडिओ त्यावर उपलब्ध असतील. या योजनेत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची व्यवस्था असून, शेतकरी या संकेतस्थळावर कंत्राटदाराची निवड करतील. कंत्राटदाराकडून सौर कृषिपंप बसवून घेऊ शकतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com