अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा लाभ नाही 

अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. ही बाब लक्षात घेता दिघोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करून अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
Illegal liquor dealers do not benefit from government schemes
Illegal liquor dealers do not benefit from government schemes

चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. ही बाब लक्षात घेता दिघोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करून अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठराव घेत या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी देखील बेंबाळ पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथे अवैद्य दारूची खुलेआम विक्री होते. गावातील लहान मोठ्यांना यामुळे दारूचे व्यसन जडले आहे. गावात वादविवाद देखील वाढीस लागल्याने कौटुंबिक कलह देखील निर्माण होत आहेत. या साऱ्याच्या परिणामी गावाचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गावातील दारू विक्रीमुळे अनेक संसार देखील उघड्यावर आले. याविरोधात गावातील महिलांनी अनेकदा एल्गार पुकारला होता. परंतु गावातील अवैध दारू विक्रीला पोलिसांचे छुपे समर्थ असल्याने या विरोधाचा कोणताही परिणाम दारू विक्रीवर झाला नाही. 

दिघोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता वाकुडकर, ग्रामसेवक मुन्ना सिडाम, काँग्रेस तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर सिडाम सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या विरोधात एकवटले. अवैध दारू विक्री विरोधात सर्वांनी एकत्र येत विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. या ग्रामसभेमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या सर्वांवर प्रतिबंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला. 

त्याअंतर्गत शासकीय योजनांचा दारू विक्रेत्यांना लाभ न देण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. त्यासोबतच गावात यापुढे दारू विकल्यास ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तसा ठराव देखील ग्रामसभेत घेण्यात आला. या ठरावाच्या प्रती बेंबाळ पोलिस ठाण्याला देण्यात आल्या. त्यांना देखील या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com