वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत समावेश

वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत समावेश
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत समावेश

वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी (ता.२४) प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील कळंबा महाली व सावरगाव बर्डे येथील ४३७ शेतकऱ्यांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे. यादीमध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरू झाली. दोन्ही गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र; तसेच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विशेष शिबिराच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही होत आहे. कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीत कळंबा महाली गावातील २६६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे असलेल्या यादीच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही गतीने सुरू होती.सावरगाव बर्डे येथील १७१ शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये आहेत. सावरगाव येथेही आपले सरकार सेवा केंद्र आणि विभाग व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही करण्यात आली.  कर्जाचा बोजा दूर झाला : पंकज महाले  राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना राबवून आमचे कर्ज माफ केले, त्यामुळे आमच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दूर झाला असून मी सरकारचे आभार मानतो, असे कळंबा महाली येथील शेतकरी पंकज रामकृष्ण महाले यांनी सांगितले. ७२ हजार २२३ रुपयांच्या कर्जमुक्तीस ते पात्र ठरले आहेत.

 गावातच आधार प्रमाणीकरण : आत्माराम महाले माझे नाव कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आले असून मी आजच आधार प्रमाणीकरण केले आहे. गावातच आधार प्रमाणीकरणाची सुविधा मिळाल्याने गैरसोय झाली नाही. माझे ५४ हजार ७५८ रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. 

कर्जमुक्तीमुळे दिलासा मिळाला : अशोक कड पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न घटले. मात्र राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये माझे सर्व १ लक्ष ८८ हजार ५०९ रुपये पीक कर्ज माफीस पात्र ठरल्याने मला दिलासा मिळाल्याचे सावरगाव बर्डे येथील शेतकरी अशोक ग्यानुजी कड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com