Agriculture news in marathi The little girl helped the CM aid fund | Agrowon

चिमुकलीने जपली अशीही संवेदनशीलता 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

अमरावती ः येथील रुधिरा जितेंद्र दखने या पाच वर्षाच्या चिमुकलीने आपल्या बचत बॅंकेत जमा झालेली रक्‍कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. चिमुकल्या रुधिराचे या औदार्य व सामंजस्यपणाबद्दल कौतुक होत आहे. 

अमरावती ः येथील रुधिरा जितेंद्र दखने या पाच वर्षाच्या चिमुकलीने आपल्या बचत बॅंकेत जमा झालेली रक्‍कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. चिमुकल्या रुधिराचे या औदार्य व सामंजस्यपणाबद्दल कौतुक होत आहे. 

रुधिरा ही अमरावतीच्या होलीक्रॉस शाळेची केजी वनची विद्यार्थिनी आहे. वाढदिवस तसेच इतर विविध कार्यक्रमांना तिला पाहूण्यांकडून खाऊसाठी पैसे मिळाले होते. हे पैसे तीने आपल्या बचत बॅंकेच्या माध्यमातून जमा केले. सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढीस लागलेला आहे. त्यावर नियंत्रणाकरिता प्रशासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चिमुकल्या रुधिराने तिच्याकडील तीन हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. 

वडील जितेंद्र दखने यांनी रुधिराच्या इच्छेनुसार रक्‍कमेचा धनादेश तयार करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या सुपूर्द केला. चिमुकलीच्या या संवेदनशीलतेबद्दल महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांन तिचे कौतुक केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...