औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला विक्रीतून ५ कोटी ७५ लाखांची उलाढाल

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलेल्या थेट फळे, भाजीपाला विक्रीची उलाढाल ५ कोटी ७५ लाख ८० हजार ९६६ रुपयांवर पोहोचली आहे.
Live fruits, vegetables in Aurangabad 5 crore 75 lakhs from sales
Live fruits, vegetables in Aurangabad 5 crore 75 lakhs from sales

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलेल्या थेट फळे, भाजीपाला विक्रीची उलाढाल ५ कोटी ७५ लाख ८० हजार ९६६ रुपयांवर पोहोचली आहे. 

कोरोना संकटामुळे औरंगाबाद शहरातील फळे भाजीपाला विक्रीला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला. तरीही तालुकास्तरावरील फळे, भाजीपाल्याची विक्री शेतकऱ्यांना आर्थिक आधार देते आहे.

लॉकडाउनमध्ये औरंगाबाद शहरात कृषी विभागाच्या समन्वयातून शेतकरी, शेतकरी गटांनी उत्पादित फळे, भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमात आतापर्यंत ७७ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग आहे. 

दरम्यान, बुधवारी (ता.२७) एकाच दिवशी तालुकास्तरावर ३८ हजार ८११ किलो भाजीपाला, तर १ लाख ११ हजार ३८७ किलो फळांची विक्री झाली. त्याद्वारे शेतकऱ्यांनी १३ लाख ३४ हजार ९९२ रुपयांची कमाई केली. २९ मार्च पासून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गत २७ मेपर्यंत १३ लाख ७८ हजार ७२० किलो भाजीपाला, तर २६ लाख ९८ हजार २८२ किलो फळांची विक्री करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com