औरंगाबादमध्ये सव्वा लाख किलोवर फळे, भाजीपाल्याची थेट विक्री

औरंगाबाद : कृषी विभागाद्वारे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत शेतकरी ते ग्राहकांची साखळी घट्ट होत आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत १ लाख ३५ हजार ४६६ किलो फळे, भाजीपाल्याची विक्री करण्यात आली.
Live sale of fruits, vegetables directly over 1.35 lakh kg in Aurangabad
Live sale of fruits, vegetables directly over 1.35 lakh kg in Aurangabad

औरंगाबाद : कृषी विभागाद्वारे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत शेतकरी ते ग्राहकांची साखळी घट्ट होत आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत १ लाख ३५ हजार ४६६ किलो फळे, भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. शेतकरी व शेतकरी गटांचा सहभागही वाढला असल्याचे चित्र आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित फळे, भाजीपाल्याची विक्री करता यावी, ग्राहकांना चांगल्या दर्जाचा भाजीपाला व फळे मिळावा, म्हणून कृषी विभागातर्फे शेतकरी ते ग्राहक थेट फळे भाजीपाला विक्रीचा उपक्रम २९ मार्चपासून सुरु करण्यात आला. सुरुवातीला जवळपास ४० शेतकरी व शेतकरी गट विक्रीसाठी पुढे आले होते. आता ही संख्या जवळपास ५३ वर पोचली आहे. दर दिवशी होणारी जवळपास २ लाख रुपयांची उलाढाल आता ४ लाखाच्या पुढे गेली आहे. 

बुधवारी (ता ८) एकाच दिवशी ८१२४ किलो भाजीपाला, तर ९ हजार ४७६ किलो फळांची शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना विक्री केली होती. त्यातून जवळपास ४१५११५ रुपयांची उलाढाल झाली. कृषी विभागातर्फे महसूल, पोलीस, सहकार व शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांद्वारे ग्राहकांची मागणी व शेतकऱ्यांच्या पुरवठ्याची सांगड घातली जात आहे. थेट विक्रीतून जवळपास ३४ लाख ८ हजार ८४२ रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. प्रशासनाच्या सूचना, नियमांचे पालन करून ग्राहकांना भाजीपाला पुरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.  पोलिस वसाहतीत शेतकऱ्यांची सेवा 

जनतेची अविरत सेवा करणाऱ्या पोलिस, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना फळे भाजीपाला थेट पुरवठा करण्याचे काम कृषी विभाग व शेतकरी गटांनी हाती घेतले आहे. गुरुवारी (ता.९) डीसीपी मीना मकवना यांच्या हस्ते पोलिस वसाहतीत भाजीपाला पुरविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते. फेरण जळगाव (ता.औरंगाबाद) येथील गणेश शेळके या शेतकऱ्याने आपली द्राक्षे व मोसंबी, नृसिंह कृषी विकास शेतकरी गट, खेरडा, (ता. पैठण) व भूमिपुत्र शेतकरी गट भिव धानोरा, (ता. गंगापूर) यांनी भाजीपाला व फळे विक्रीस आणली होती. या उपक्रमास पोलिस वसाहतीत मोठा प्रतिसाद मिळाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com