Agriculture News in Marathi Livestock health Facilities will be available immediately | Agrowon

पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ मिळणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्यविषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा तत्काळ मिळणार आहे.

नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्यविषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा तत्काळ मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले. 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ६ कोटी ९१ लाख रुपये निधी खर्चून पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण केंद्रीय रास्ते विकास व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात केदार बोलत होते. 

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अभिजित वंजारी, माफसूचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातुरकर, पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे ए. पी. सोमकुंवर, कार्यकारी परिषदेचे डॉ. सुधीर दिवे, डॉ. संदीप इंगळे, डॉ. वैद्य, डॉ. दुधलकर या वेळी उपस्थित होते. 

केदार म्हणाले, ‘‘मध्य भारतात प्राण्यांच्या आरोग्यविषयक सुविधा व औषधोपचारासाठी हे एकमेव संकुल आहे. शेळी व कुक्कुटपालनावर शासनाचा अधिक भर राहणार असून, विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे निश्‍चितच चालना मिळणार आहे. ‘सानेन’ या प्रजातीच्या शेळीचे पालन करून दुग्ध उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषीसह पशुसंवर्धनावर आधारित आहे. त्याच धर्तीवर विदर्भात प्रयत्न केले जातील. विद्यापीठाचे विस्तारीकरण करून ज्ञान सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी ग्रामीण भागात शिबिर आयोजित करा.’’ 

नितीन गडकरी म्हणाले, ‘‘सर्व सुविधा युक्त असे अत्याधुनिक पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुल नागपूर येथे झाले. त्यामुळे प्राण्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळून बाहेरून उपचार करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर पशुपालकांना इथेच सर्व सुविधा मिळणार आहेत. विदर्भात ६ हजार ५०० हजार मामा तलाव आहेत. त्यामध्ये मत्स्यपालन केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल.’’

पशुपालकांसाठी ‘एम्स किसान पोर्टल’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सोमकुंवर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आखरे यांनी मानले. या कार्यक्रमास पशू व मत्स्य परिषदेचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...