Agriculture news in marathi Livestock market in Khandesh closed | Agrowon

खानदेशातील पशुधनाचे बाजार बंद 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

जळगाव ः उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले खानदेशातील पशुधनाचे बाजार सुमारे ४० ते ४२ दिवसांपासून विस्कळीत झाले आहेत. शेतकऱ्यांना नव्या बैलजोड्या, दुभते पशुधन घेण्यासह विक्रीबाबत अडचणी येत आहेत. तर व्यापाऱ्यांकडील पशुधनही तसेच बांधून ठेवावे लागत आहे. 

जळगाव ः उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले खानदेशातील पशुधनाचे बाजार सुमारे ४० ते ४२ दिवसांपासून विस्कळीत झाले आहेत. शेतकऱ्यांना नव्या बैलजोड्या, दुभते पशुधन घेण्यासह विक्रीबाबत अडचणी येत आहेत. तर व्यापाऱ्यांकडील पशुधनही तसेच बांधून ठेवावे लागत आहे. 

जळगाव जिल्ह्यात वरखेडी (ता. पाचोरा), नेरी (ता. जामनेर), सावदा (ता. रावेर), वैजापूर (ता. चोपडा), चोपडा, चाळीसगाव, फैजपूर (ता. यावल) येथील पशुधनाचा बाजार प्रसिद्ध आहे. धुळ्यातील धुळे, शिरपूर, नंदुरबारमध्ये शहादा, नंदुरबार येथील बाजार प्रसिद्ध आहे. परंतु हे सर्व बाजार महिनाभरापासून बंद आहेत. नवा हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी नव्या बैलजोड्यांची गरज अनेक शेतकऱ्यांना आहे. अनेक व्यापारी गोऱ्ह्यांचे संगोपन करून उमद्या बैलजोड्या तयार करतात. 

तसेच अनेक शेतकऱ्यांना दुभते पशुधन हवे आहे. तर काहींना पशुधन अधिक झाल्याने त्याची विक्री करायची आहे. अशातच पशुधनाचे बाजार बंद आहेत. यामुळे कोट्यवधींची उलाढाल बंद आहे. पशुधन विक्रीअभावी व्यापारी, शेतकऱ्यांकडेच आहे. त्यामुळे वित्तीय उलाढाल बंद असून, बाजार समित्यांचा महसुलही कमी झाला आहे. खानदेशातील बाजारांमध्ये औरंगाबाद, जालना, नाशिक, मध्य प्रदेशातील शेतकरी, खरेदीदारदेखील येतात. परंतु बाजार बंद असल्याने शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांच्यासमोर अडचणी वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...