जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू 

कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार हळूहळू सुरू होत आहेत. मात्र जनावरांना मागणी नसल्याने जनावरांच्या किमतीत घट झाली असल्याचे चित्र आहे.
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू  Livestock market started in Kolhapur
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू  Livestock market started in Kolhapur

कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार हळूहळू सुरू होत आहेत. मात्र जनावरांना मागणी नसल्याने जनावरांच्या किमतीत घट झाली असल्याचे चित्र आहे.  कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांचा मोठा बाजार म्हणून हा बाजार प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे येथील जनावरांचा बाजार बंद होता, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर बुधवारी (ता.२२) दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जनावरांचा बाजार भरला होता. पहिल्या दिवशी बाजारात मोजकी जनावरे खरेदी-विक्रीसाठी आली होती. देणारे व घेणारे सर्वच आर्थिक अडचणीत असल्यामुळे जनावरांचे दर पडलेले पाहावयास मिळाले. गाईची किंमत सुमारे ३० हजार, बैलाची किंमत सुमारे ३५ हजारांच्या घरात होती.  जिल्ह्यातील अन्य भागांत ही अशीच स्थिती आहे. अनेक शेतकरी अडचणीमुळे जनावरांची विक्री करत आहेत. पण जनावर खरेदी करण्यासाठी चढाओढ होत नसल्याने अगदी निम्या किमतीपर्यंत जनावरे विकली जात असल्याचे बाजारात खरेदी-विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ही हळूहळू प्रमाणात बाजार सुरू होत आहेत. मात्र उत्साह नसल्याने दरात तेजी नसल्याचे संबंधित बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com