Agriculture News in Marathi Livestock market started in Kolhapur | Page 3 ||| Agrowon

जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार हळूहळू सुरू होत आहेत. मात्र जनावरांना मागणी नसल्याने जनावरांच्या किमतीत घट झाली असल्याचे चित्र आहे. 

कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार हळूहळू सुरू होत आहेत. मात्र जनावरांना मागणी नसल्याने जनावरांच्या किमतीत घट झाली असल्याचे चित्र आहे. 

कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांचा मोठा बाजार म्हणून हा बाजार प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे येथील जनावरांचा बाजार बंद होता, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर बुधवारी (ता.२२) दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जनावरांचा बाजार भरला होता. पहिल्या दिवशी बाजारात मोजकी जनावरे खरेदी-विक्रीसाठी आली होती. देणारे व घेणारे सर्वच आर्थिक अडचणीत असल्यामुळे जनावरांचे दर पडलेले पाहावयास मिळाले. गाईची किंमत सुमारे ३० हजार, बैलाची किंमत सुमारे ३५ हजारांच्या घरात होती. 

जिल्ह्यातील अन्य भागांत ही अशीच स्थिती आहे. अनेक शेतकरी अडचणीमुळे जनावरांची विक्री करत आहेत. पण जनावर खरेदी करण्यासाठी चढाओढ होत नसल्याने अगदी निम्या किमतीपर्यंत जनावरे विकली जात असल्याचे बाजारात खरेदी-विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ही हळूहळू प्रमाणात बाजार सुरू होत आहेत. मात्र उत्साह नसल्याने दरात तेजी नसल्याचे संबंधित बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू...अमरावती : सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना...
जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू...जळगाव ः खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
सांगली जिल्ह्यातील थकबाकीमुक्तीत ५५...सांगली ः ‘‘कृषिपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
दोन लाख ९५ हजार टन खतांचे आवंटन मंजूरऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
दोन लाख ३८ हजार खातेदारांचे आधार...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
ग्रामबीजोत्पादनातून हरभरा, गहू...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल...जुन्नर, जि. पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या...
जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना...जळगाव : जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या...
नगर जिल्ह्यात सव्वानऊ हजार शेतकऱ्यांचे...नगर : जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६३५ शेतकऱ्यांनी...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...