अमरावती विभागात कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कासवगती

पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पिककर्जासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असतानाही राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाची गती मंदावली आहे.
अमरावती विभागात कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कासवगती Loan disbursement in Amravati division The pace of nationalized banks
अमरावती विभागात कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कासवगती Loan disbursement in Amravati division The pace of nationalized banks

यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पिककर्जासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असतानाही राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाची गती मंदावली आहे. अमरावती विभागात राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथ आहे. आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ १४.२५ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. यंदाच्या हंगामातही बँकांनी अडवणुकीचे धोरण अवलंबिले आहे. कासवगतीने पीककर्ज वाटप होत आहे. आतापर्यंत विभागात केवळ ३७ टक्के पीककर्ज वाटप झालेले आहे. त्यातही जिल्हा बँकेने पीककर्ज वाटप केल्याने पीककर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच आहे. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवीत आहेत. मात्र, त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांत सर्वांधिक त्रुटी काढल्या जात असल्याची ओरड आहे. या २०२१-२१२२ साठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकांना जवळपास सहा हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य देण्यात आले.  जिल्हा बँकेने उद्दिष्टांच्या ८२ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकेने केवळ १४.२५ टक्के कर्जवाटप केले. ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांना वेळेत पीककर्ज देण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. पीककर्ज वाटप (विभाग)     कर्जवाटप लक्ष्यांक   ६ हजार ६७ कोटी ५०० क्षेत्र    ३ लाख ४५,२८३ सभासद    २,८७,७५६ रक्कम    २,४२,३४७ टक्केवारी    ३६.३१ अमरावती     कर्जवाटप लक्ष्यांक    १,२०,००० क्षेत्र    ६०,३०१ सभासद    ५१,७६२ रक्कम    ४६,८०१ टक्केवारी    ३९.०० अकोला     कर्जवाटप लक्ष्यांक    ११,४०,०० क्षेत्र    ६९,२५५ सभासद    ५४,६३६ रक्कम    ४९,६९० टक्केवारी    ४३.५९ वाशीम     कर्जवाटप लक्ष्यांक    ८२,५०० क्षेत्र    ८४,१२८ सभासद    ६२,८९९ रक्कम    ५०,७५३ टक्केवारी    ६१.५२ बुलडाणा     कर्जवाटप लक्ष्यांक    १,३०,००० क्षेत्र    २१,८६७ सभासद    २१,०३९ रक्कम    १८,२७७ टक्केवारी    १४.०६ यवतमाळ     कर्जवाटप लक्ष्यांक    २२,१००० क्षेत्र    १,०९,७३२ सभासद    ९७,४२० रक्कम    ७६,८२४ टक्केवारी    ३४.७६  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com