Agriculture news in marathi Loan disbursement in Amravati division The pace of nationalized banks | Page 2 ||| Agrowon

अमरावती विभागात कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कासवगती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पिककर्जासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असतानाही राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाची गती मंदावली आहे.

यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पिककर्जासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असतानाही राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाची गती मंदावली आहे. अमरावती विभागात राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथ आहे. आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ १४.२५ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे.

यंदाच्या हंगामातही बँकांनी अडवणुकीचे धोरण अवलंबिले आहे. कासवगतीने पीककर्ज वाटप होत आहे. आतापर्यंत विभागात केवळ ३७ टक्के पीककर्ज वाटप झालेले आहे. त्यातही जिल्हा बँकेने पीककर्ज वाटप केल्याने पीककर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे.

राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच आहे. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवीत आहेत. मात्र, त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांत सर्वांधिक त्रुटी काढल्या जात असल्याची ओरड आहे. या २०२१-२१२२ साठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकांना जवळपास सहा हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य देण्यात आले. 

जिल्हा बँकेने उद्दिष्टांच्या ८२ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकेने केवळ १४.२५ टक्के कर्जवाटप केले. ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांना वेळेत पीककर्ज देण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

पीककर्ज वाटप (विभाग)    
कर्जवाटप लक्ष्यांक   ६ हजार ६७ कोटी ५००
क्षेत्र    ३ लाख ४५,२८३
सभासद    २,८७,७५६
रक्कम    २,४२,३४७
टक्केवारी    ३६.३१

अमरावती    
कर्जवाटप लक्ष्यांक    १,२०,०००
क्षेत्र    ६०,३०१
सभासद    ५१,७६२
रक्कम    ४६,८०१
टक्केवारी    ३९.००

अकोला    
कर्जवाटप लक्ष्यांक    ११,४०,००
क्षेत्र    ६९,२५५
सभासद    ५४,६३६
रक्कम    ४९,६९०
टक्केवारी    ४३.५९

वाशीम    
कर्जवाटप लक्ष्यांक    ८२,५००
क्षेत्र    ८४,१२८
सभासद    ६२,८९९
रक्कम    ५०,७५३
टक्केवारी    ६१.५२
बुलडाणा    
कर्जवाटप लक्ष्यांक    १,३०,०००
क्षेत्र    २१,८६७
सभासद    २१,०३९
रक्कम    १८,२७७
टक्केवारी    १४.०६

यवतमाळ    
कर्जवाटप लक्ष्यांक    २२,१०००
क्षेत्र    १,०९,७३२
सभासद    ९७,४२०
रक्कम    ७६,८२४
टक्केवारी    ३४.७६
 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...