पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना कर्जवाटप

पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या साडे पाच महिन्यात दोन लाख नऊ हजार ५१३ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले.
 Loan disbursement to over two lakh farmers in Pune district
Loan disbursement to over two lakh farmers in Pune district

पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या साडे पाच महिन्यात दोन लाख नऊ हजार ५१३ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. एकूण १५८३ कोटी २३ लाख ८८ हजार रूपये अर्थात ९५ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा बँकेने १६५३ कोटी ४२ लाख ७५ रूपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. बॅंकेच्या तालुका, गावपातळीवरील २७५ शाखांमधून कर्जवाटप केले आहे. गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना दिला जातो.

जिल्ह्यात बँकेची खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० हून अधिक आहे. त्यापैकी जवळपास दोन लाखाहून अधिक सभासद शेतकरी पीक कर्ज घेतात. यंदा बँकेने तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जवाटप केले. तर, तीन लाखाहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले.

जिल्हा बँकेने ३५ हून अधिक पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली केली. यामध्ये खरिपातील बहुतांशी सर्व पिके, फळपीके, भाजीपाला, फुलपिकांच्या पीक कर्ज दरात १ हजार ते ५५ हजार हजार रूपयांपर्यत वाढ केली. पीक कर्जाची परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरिपात तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षी खरिपात याच कालावधीत ठेवलेल्या १४३५ कोटी १८ लाखापैकी एक लाख १४ हजार ११० शेतकऱ्यांना ११३८ कोटी ८६ लाख पाच हजार रूपयांचे वाटप केले होते. सरासरी ७९ टक्के वाटप केले होते. 

या पिकांसाठी कर्ज 

तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, सुर्यफूल, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची आदी पिकांसाठी जिल्हा बॅंकेतर्फे पीककर्ज दिले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com