पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफी

पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफी
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफी

चंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख कोटींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी सादर केला. या वेळी त्यांनी राज्यातील भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफी जाहीर केली. तसेच मंडी शुल्कात कपात करत चार टक्क्यांवरून एक टक्क्यावर आणले आहे.  पंजाबचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता.२८) राज्याचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी सादर केला. त्यांनी राज्याचा एकूण १.५४ लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडला. या वेळी त्यांनी राज्यातील भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफी जाहीर करत यासाठी ५२० कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात १३ हजार ०९२ कोटी रुपये शिक्षणासाठी आणि चार हजार ६७५ कोटी आरोग्यासाठी देण्यात आले आहेत.  राज्यातील मंडींमध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंडी शुल्क चार टक्क्यांवरून ती टक्के कपात करून एक टक्का करण्यात आले आहे. तसेच जमीन वापर बदलाचे शुल्क दोन वर्षांसाठी माफ करण्यात आले आहेत.  बादल यांनी राज्यात दोन कृषी महाविद्यालयांची घोषणा केली आहे. गुरुदासपूर आणि बलाचौर येथे हे महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com