नुकसानग्रस्तांना कर्जमाफीही द्यावी : शिवसेना

loan waiver along with compensation to affected farmers; Sena demanded, Movement throughout Pune district
loan waiver along with compensation to affected farmers; Sena demanded, Movement throughout Pune district

पुणे : पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना पीक नुकसानभरपाई बरोबरच तातडीने कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसीलदार कार्यालयांवर सोमवारी (ता. २५) मोर्चे काढण्यात आले. या वेळी भाजीपाला पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी २५ हजार तर फळबागांसाठी ५० हजार रुपयांची मदत तातडीने शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

पुण्यात हवेली तहसीलदार कार्यालयावर जिल्हाप्रमुख माऊली कटके आणि रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी कटके म्हणाले, की नुकसानग्रस्त शेतीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. केवळ नुकसान बघून भरपाई दिली जात आहे. शासनाने जाहीर केलेली भरपाईची रक्कम अत्यंत तोकडी असून, भाजीपाल्याच्या नुकसानीसाठी हेक्टरी २५ हजार आणि बागायतीसाठी ५० हजार रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी. मदत वेळेवर मिळाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या वेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुनील कोळी यांना देण्यात आले.

जिल्ह्यात जुन्नरमध्ये तालुकाप्रमुख माउली खंडागळे, घोडेगाव येथे तालुकाप्रमुख अरुण गिरे, खेडमध्ये माउली धनवटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करून, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com