agriculture news in marathi, in loan waiver scheme amount will be returned of ots, mumbai, maharashtra | Agrowon

व्यक्ती घटक सूत्रांनुसार ‘ओटीएस’ची दीड लाखावरील रक्कम परत मिळणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेत कुटुंबाऐवजी नव्याने व्यक्ती हा घटक गृहीत धरला जात असल्याने पूर्वीच्या निकषानुसार शेतकऱ्याने एकरकमी परतफेड योजनेच्या (ओटीएस) लाभासाठी भरलेली दीड लाखाच्या वरील रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना परत केली जाणार आहे. उदाहरणार्थ, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याने उर्वरित एक लाख रुपये भरले असतील, तर अशा प्रकरणांत व्यक्ती घटक या सूत्रानुसार इतर निकषांच्या अधीन राहून पात्र शेतकऱ्यांना भरलेली अशी रक्कम परत मिळणार आहे. सहकार खात्याने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेत कुटुंबाऐवजी नव्याने व्यक्ती हा घटक गृहीत धरला जात असल्याने पूर्वीच्या निकषानुसार शेतकऱ्याने एकरकमी परतफेड योजनेच्या (ओटीएस) लाभासाठी भरलेली दीड लाखाच्या वरील रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना परत केली जाणार आहे. उदाहरणार्थ, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याने उर्वरित एक लाख रुपये भरले असतील, तर अशा प्रकरणांत व्यक्ती घटक या सूत्रानुसार इतर निकषांच्या अधीन राहून पात्र शेतकऱ्यांना भरलेली अशी रक्कम परत मिळणार आहे. सहकार खात्याने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमधील कर्जमाफीच्या लाभाबाबतचा असंतोष, संदिग्धता आणि विरोधकांचे आरोप यामुळे सरकारने नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट शिथिल करून कुटुंबातील प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबाला एकत्रित दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीच मिळत होती.

योजनेच्या आधीच्या निकषानुसार कुटुंबाच्या सर्व कर्जदार सदस्यांच्या पात्र कर्जखात्याची एकूण थकबाकी दीड लाखापेक्षा जास्त आहे, अशा अर्जदार कुटुंबातील पात्र सदस्यांनी दीड लाखावरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर त्यांना शासनाच्या वतीने प्रतिकुटुंब दीड लाख रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्यात येत होता. मात्र, सुधारित शासन निर्णयानुसार कर्जमाफीच्या इतर निकषांना अधिन राहून यापूर्वीच्या प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभाऐवजी यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्याला दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

१ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत आणि पुनर्गठीत कर्जाच्या ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकी रकमेपोटी कुटुंबातील पात्र वैयक्तिक कर्जदार सदस्याला दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. ही रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास योजनेच्या प्रचलित (कुटुंब घटक) निकषानुसार दीड लाखावरील रक्कम कुटुंबातील पात्र कर्जदार सदस्याने बँकेकडे भरल्यास त्यास शासनाच्या वतीने एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाख रुपये लाभ देण्यात यावा. प्रस्तावित (व्यक्ती घटक) निकषाप्रमाणे अंमलबजावणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रचलित (कुटुंब घटक) निकषानुसार दीड लाखाच्यावर भरलेली रक्कम परत करण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी कर्जमाफी योजनेत कुटुंबाऐवजी व्यक्ती हा घटक गृहीत धरण्यात येत असल्याने शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्यांच्या वैयक्तिक कर्जखात्यांच्या थकबाकीची पुनर्गणना करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपये कर्जमाफी, एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गणनेनंतर लाभ निश्चित करून कुटुंबातील वैयक्तिक कर्जदार सदस्याची पात्र थकबाकीची रक्कम दीड लाखापेक्षा कमी असल्यास अशा परिस्थितीत योजनेच्या यापूर्वीच्या निकषानुसार कुटुंबाच्या एकूण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी भरलेली दीड लाखावरील रक्कम शासनाकडून शेतकऱ्याच्या बँक खात्यात परत करण्यात येणार आहे.

तसेच बदललेल्या निकषानुसार कर्जदार वैयक्तिक शेतकऱ्याची थकबाकीची रक्कम दीड लाखाच्या आत असल्यास आणि लागू असेल तेथे अशा शेतकऱ्यांकडील पुर्नगठीत कर्जाच्या उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाख या मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
दरम्यान, या सुधारित निर्णयाचा दाखला देत शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने बँकांचे उंबरठे झिझवत आहेत. मात्र, काही ठिकाणी शासन आदेश मिळाला नसल्याचे सांगत बँका हात वर करत असल्याचे दिसून येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...