agriculture news in marathi loan waiver scheme benefit farmers in Jalgaon District | Agrowon

खानदेशात कर्जमाफीचा लाभ सुरू, मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक वंचित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

जळगाव : खानदेशात शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, आधार प्रमाणीकरण केलेल्या सुमारे दोन लाख शेतकऱ्यांपैकी ८० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली आहे. 

जळगाव : खानदेशात शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, आधार प्रमाणीकरण केलेल्या सुमारे दोन लाख शेतकऱ्यांपैकी ८० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली आहे. 

यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड झाली आहे. नव्याने कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण सुरू करावे, असा मुद्दाही उपस्थित केला जात असून, बॅंकांची त्याबाबत बैठक घेण्याची मागणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख ४३ हजार, धुळ्यात सुमारे एक लाख तर नंदुरबारातही एक लाखांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यात मिळून सुमारे ८० हजार तर नंदुरबारातही २० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम शासनाने जमा केली आहे. बॅंकांना त्याची रोजची माहिती ऑनलाइन मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेशही दिला जात असल्याची माहिती मिळाली. 

उपायांसाठी समिती
आधार प्रमाणीकरणासंबंधी तांत्रिक अडचणी येत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात मात्र लाभाची रक्कम जमा झालेली नाही. हे तांत्रिक दोष शोधण्यासह त्यावर उपाय करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला या आठवड्यात अंतिम कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

एप्रिल महिन्यापर्यंत खानदेशातील ९० टक्के कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचे संकेत मिळत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख २५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहेत. तर धुळे व नंदुरबारात ९० टक्‍क्‍यांवर कर्जमुक्ती योजनेचे काम पूर्ण झाले आहे. कामाची गती वाढविण्यासाठी या आठवड्यात कर्जमुक्ती योजनेसंबंधीची समिती बैठका घेणार असल्याची माहिती मिळाली.
 


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...