agriculture news in Marathi loan waiver scheme is weak and hopeless Maharashtra | Agrowon

कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक आणि कॉर्पोरेट विमा कंपन्यांचे कल्याण करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी बिनकामाची आणि तकलादू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी हे दोघेही शेतकऱ्यांसाठी काही करीत नाहीत. किमान महाविकास आघाडी धार्मिक भेदभाव वगैरे करीत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने ही आघाडी म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. 

नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक आणि कॉर्पोरेट विमा कंपन्यांचे कल्याण करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी बिनकामाची आणि तकलादू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी हे दोघेही शेतकऱ्यांसाठी काही करीत नाहीत. किमान महाविकास आघाडी धार्मिक भेदभाव वगैरे करीत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने ही आघाडी म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. 

शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी राहाता (जि. नगर) येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, की पीकविमा कंपन्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लूटमार करतात. त्यांच्या विरोधात सर्व स्तरावर आम्ही पुराव्यानिशी तक्रारी केल्या. काहीही उपयोग झाला नाही.

गेल्या तीन-चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याऐवजी विमा कंपन्या मालामाल झाल्या, हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो; मात्र त्यांच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांची पुरती निराशा केली. ‘‘शेतकऱ्यांची व्होट बॅंक व दबाव गट तयार होत नाही.

शेतकरी हा शेतकरी म्हणून मतदान करीत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे शेती राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांचे संघटन करून सरकारवर दबाव आणतो. विरोधात असलेला पक्ष नेहमी शेतकरीहिताच्या गप्पा मारतो. सत्तेत गेला की पायउतार झालेला पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने बोलू लागतो. सत्ताधारी पक्षावर शेतकऱ्यांचा दबाव राहत नाही, तोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी आमची धडपड सुरू असते,’’ असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. या वेळी रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोफळे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

इथेनॉल खरेदीचा कराराला विरोध
देशातील तेल कंपन्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्राझीलसोबत स्वस्त इथेनॉल खरेदीचा करार करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. तसे झाले तर देशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक अडचणीत सापडतील. आम्ही या करारास विरोध करू. वाड्या-वस्त्यांवरील कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर त्यालाही जोरदार विरोध करू. या निर्णयामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या मुला-मुलींना शिक्षणाची दारे बंद होतील.


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...