राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने कर्जपुरवठा झालाच पाहिजे ः अजित पवार

कर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
Loans must be provided with the help of nationalized banks: Ajit Pawar
Loans must be provided with the help of nationalized banks: Ajit Pawar

नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण करावे. इतर कर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. 

    शेतकऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात गुरुवार(ता. १७) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक देशमुख,   बँकेचे प्रशासक अन्सारी, सहकारी संस्था सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे उपस्थित होते.

अनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाही. या संस्थांना तफावतीमधून बाहेर काढावे, कारण ४५३ संस्था अनिष्ट तफावतीमध्ये आहेत, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेतील अनियमितता व भ्रष्टाचार चर्चेत  नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेपोटी जिल्हा बँकेला ९२० कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त २३१.५१ कोटी पीककर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com