Agriculture news in Marathi Loans must be provided with the help of nationalized banks: Ajit Pawar | Page 2 ||| Agrowon

राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने कर्जपुरवठा झालाच पाहिजे ः अजित पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

कर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. 

नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण करावे. इतर कर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. 

    शेतकऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात गुरुवार(ता. १७) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक देशमुख,   बँकेचे प्रशासक अन्सारी, सहकारी संस्था सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे उपस्थित होते.

अनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाही. या संस्थांना तफावतीमधून बाहेर काढावे, कारण ४५३ संस्था अनिष्ट तफावतीमध्ये आहेत, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेतील अनियमितता व भ्रष्टाचार चर्चेत 
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेपोटी जिल्हा बँकेला ९२० कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त २३१.५१ कोटी पीककर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...