agriculture news in marathi Loanwaiver scheme first list tobe decleard today : Uddhav Thackery | Agrowon

कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर : ठाकरे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे रविवारी (ता. २३) केले. तसेच कर्जमाफीची पहिली यादी उद्या (आज सोमवारी) जाहीर करणार आहे. प्रथम जिल्ह्यातील २ गावांची ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच महिला अत्याचाराबाबत आमचे सरकार हे संवेदनशील असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे रविवारी (ता. २३) केले. तसेच कर्जमाफीची पहिली यादी उद्या (आज सोमवारी) जाहीर करणार आहे. प्रथम जिल्ह्यातील २ गावांची ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच महिला अत्याचाराबाबत आमचे सरकार हे संवेदनशील असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ उद्या (सोमवार)पासून मिळायला सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींची यादी लावण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 

कर्जमाफीची योजना राबविताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येतील आणि एप्रिल २०२० अखेरपर्यंत सर्व अंमलबजावणी व्हावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोमवारी ६८ गावांची यादी लावण्यात येईल आणि लाभही तात्काळ मिळतील, असे ठाकरे यांनी जाहीर केले. आतापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे आकडे समोर आले असून त्या सर्व ३५ लाख शेतकऱ्यांची एप्रिल अखेरपर्यंत सरसकट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. 

तत्कालीन देवेंद्र फडवणीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तब्बल साठ महिने कर्जमाफीची योजना सुरू राहिल्याचा चिमटा काढत महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी केवळ तीन महिन्यात पूर्ण केली जाईल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी मध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेतली असून टप्याटप्याने ही योजना राबवण्यामागे ही दक्षता कारण असल्याचे ठाकरे म्हणाले.

एलगार परिषदेचा तपास मी केंद्र सरकारकडे दिलेला नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मात्र, त्याबाबत मी नाराज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सीएए आणि एनआरसीबद्दल माझी भूमिका स्पष्ट असल्याचे ठाकरे म्हणाले. मात्र, एनआरपी बद्दल आम्ही जबाबदार मंत्र्यांची समिती नेमून चर्चा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. 

राज्यात लवकरच आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा 
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार अभ्यास करून लवकरच आंध्र प्रदेशच्या धर्तीवर नवीन कायदा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.  लवकरच हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे देशमुख म्हणाले.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...