स्थानिक आवक कमी; भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणा

स्थानिक आवक कमी; भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणा
स्थानिक आवक कमी; भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणा

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. स्थानिक आवक कमी असल्याने परराज्यांमधून आवक वाढत असून, मध्य प्रदेशातून मटारीची सुमारे २५ ट्रक आवक झाली होती. ही आवक सरासरी सुमारे १० ते १२ ट्रक एवढी असते. दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक आवकेवर परिणाम झाला असून, भेंडी, टोमॅटो, काकडी, सिमला मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.  

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून चार ट्रक कोबी, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून ४ टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३  ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १० ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून २५ ट्रक मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे सहा हजार गोणी तर सोमवार (ता. ३) च्या कार्तिकी एकदशीनिमित्त बेळगाव येथून रताळ्याची सुमारे ३०० गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्र्च्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १२०० गोणी, टॉमेटोे सुमारे चार हजार क्रेट, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, भेंडी ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची ५ टेमपो,  पावटा ५ टेम्पो, गवार ५ टेम्पो आणि कराड येथून रताळ्याची सुमारे ७०० गोणी आवक झाली होती. तसेच नवीन कांदा सुमारे ९० तर जुना सुमारे ४० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाट्याची ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : जुना  ४०-८०, जुना ८०-१३०, बटाटा : आग्रा ६०-१४०, इंदौर १६०-१८०, लसूण : १००-२००, आले : सातारी : ५५०-६५०, बंगलोर : ५५०-६००, भेंडी : ३००-४००,  गवार : गावरान, सुरती ३००-४००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : २५०-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२२०, पडवळ : १४०-१६०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ४०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००, जाड : ८०-१००, शेवगा : ४००, गाजर : परराज्य १२०-१६०, स्थानिक ः १००-१२०, वालवर : २००-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : १५०-२००, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ३५०-४००, पावटा : २५०-३००, मटार : ३००-३२०, तांबडा भोपळा : ६०-१००, रताळी - कराड - १५०-१६०, बेळगाव -१००-१२०, सूरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे २ लाख तर मेथीची सुमारे १ लाख जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४००-९००,  मेथी : ५००-७००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ६००-७००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ४००-८००.

फळबाजार रविवारी (ता. २) फळ विभागात मोसंबी सुमारे १०० टन, संत्री १० टन, डाळिंब २०० ते २५० टन, पपई १५ ते २० टेम्पोे, लिंबाची ४ हजार गोणी, चिक्कू ३ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू १२०० क्रेटस्, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे अडीच हजार गोणी, सीताफळ सुमारे ५ टन आणि द्राक्ष सुमारे ७ इतकी आवक झाली होती. फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १३०-२६०, (४ डझन ) : ६०-१२०, संत्रा : (३ डझन) १३०-२६०, (४ डझन) : ६०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १०-६०, गणेश ५-२०, आरक्ता ५-३०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२०, पपई  : ५-१५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-७००, सीताफळ : २०-२५०, सिमला (२५ किलो) १३००-२०००, किन्नोर : (२५ ते २८ किलो) २३००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५ किलो) ७००-१२००, बोरे : चेकनट (१० किलो) ४५०-४८०, उमराण (१० किलो) ५०-६०, चमेली (१० किलो) ८०-११०, चण्यामण्या ३००-३५०. द्राक्षे : तास-ए-गणेश १५ किलो १२०० ते १६००, जंम्बो १० किलो ८०० ते ११००.

फुलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-५०, गुलछडी : २०-३०, बिजली : २०-४०, कापरी : १०-४०, शेवंती २०-४०, ऑस्टर : १०-१६, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : २०-७०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०, लिलिबंडल : ५-८, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१२०, चमेली : ६००.

मासळी गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता.२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे  अवघी १ टन, नदी आणि खाडीची प्रत्येकी सुमारे ५०० किलो, तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ५०० किलो आवक झाली होती. वाढत्या थंडीमुळे मासेमारीवर परिणाम झाला असून, आवक घटल्याने सर्वच मासळींच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. तर गावरान अंड्याच्या शेकड्याच्या दरात २० तर इंग्लिश अंड्याच्या दरात १८ रुपयांनी वाढ झाल्याचे रुपेश परदेशी यांनी सांगितले. मटण, चिकनचे दर स्थिर होते.   खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १३५० मोठे : १४५०, मध्यम : ८०० लहान : ६५०, भिला : ४५०, हलवा : ४४०, सुरमई : ४४०-५००, रावस-लहान : ४८०, मोठे ५२०, घोळ : ४४०, करली : २८०, करंदी: १२०, भिंग : ३६०, पाला : ७००, वाम : ६००, ओले बोंबील : १२०. कोळंबी ः लहान : १८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : ८५० टायरग १४००, किंगप्रॉन्स : ६५०, लॉबस्टर :१४५०, मोरी :  २८०, मांदेली : ८० राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४४०. खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २४०, नगली : ४५०, तांबोशी : ३२०, पालू : २४०, लेपा : २००, शेवटे : २४० बांगडा : लहान १४० मोठा १८० पेडवी : ८०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १६०, तारली : १४०. नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १८०, मरळ : ३८०, शिवडा : १६०, खवली : १८०, आम्ळी : ८० खेकडे : २४०, वाम : ३६०.

मटण ः बोकडाचे ४८०, बोलाई ४८०, खिमा ४८०, कलेजी ५२० चिकन ः चिकन १५०, लेगपीस १८०, जिवंत कोंबडी १२०, बोनलेस २५० अंडी ः गावरान शेकडी ७००, डझन ९६, प्रतिनग ८, इंग्लिश ४२८, डझन ६०, प्रतिनग ५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com