Agriculture news in marathi Local cashew arrivals slowed down in Ajra taluka | Agrowon

स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात मंदावली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

आजरा बाजारपेठेत स्थानिक काजूची आवक मंदावली आहे. काजू प्रक्रिया युनिट धारकांनी जवळपास ८० टक्के माल खरेदी केल्याने केवळ २० टक्के माल शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचा अंदाज आहे.

आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक काजूची आवक मंदावली आहे. काजू प्रक्रिया युनिट धारकांनी जवळपास ८० टक्के माल खरेदी केल्याने केवळ २० टक्के माल शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचा अंदाज आहे. तालुक्यात एक हजार टनांपेक्षा अधिक परदेशी काजूची खरेदी व्यापारी व कारखानदारांनी केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात याचा फटका स्थानिक मालालाही बसला. काजू खरेदीचा दर मात्र १०० ते ११० रुपये प्रति किलो असा, स्थिर आहे.

कोरोनामुळे आठवडी बाजार भरला नसल्याने बाजारपेठामध्ये काजूची आवक मोठ्या प्रमाणात झाली नाही. छोट्या काजू व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात जाऊन काजूची खरेदी केली. आजरा शहरात दर वर्षी मार्च ते जून महिन्यापर्यंत व्यापारी काटे लावून खरेदी करत असतात. हे चित्र यंदा दिसले नाही.

यंदा शहरात एप्रिल व मे महिन्यांत दिवसाला एक ते दीड टन काजूची आवक होत होती. आता तर काजूची आवक मंदावली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी दराची अधिक प्रतीक्षा न करता माल काजू प्रक्रिया युनिट धारकांना विकला. काही काजू उत्पादक शेतकऱ्यांना दरात वाढ होईल, अशी प्रतीक्षा आहे, पण महिनाभरापासून प्रति किलो १०० ते ११० रुपये, असा दर स्थिर आहे. पुढे यात वाढ होईल, अशी शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

आफ्रिकन देशातून काजूची आवक
दीड महिन्यांपासून तालुक्यात बेनीन, घाना, टोगो, आयव्हरीकोस्ट, कोगोमोशो, केनीकोनोक्री, नायझेरीया, टान्झानिया यासह आठ आफ्रीकन देशातून देशात काजू बियांची आयात झाली आहे. आजरा तालुक्यातही १००० टनापेक्षा अधिक काजू बीची खरेदी व्यापारी व काजू प्रक्रिया युनिट धारकांनी केली आहे. प्रतिकिलो १०८ रुपयापर्यंत खरेदी झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम स्थानिक काजू बीवर झाला आहे. परदेशी काजू पांढरा, लांबट, आकर्षक गर, काउंट व उताराही चांगला आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाचा परिणाम
यंदा वळीव पावसाने उन्हाळ्यात चांगलाच जोर धरला होता. त्याचबरोबर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे शेतकऱ्यांना काजू बी वाळवताना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे याचा परिणाम स्थानिक मालाच्या दर्जावर झाला. दरात वाढ व मालाचा उठाव होण्यावर झाली. परदेशातून मोठ्या प्रमाणात काजू बीची आयात होत असल्याने स्थानिक बीच्या दरात वाढ होणे कठीण असल्याचे व्यापारी सांगतात.

प्रतिक्रिया
तालुक्यात आफ्रिकन देशातून मोठ्या प्रमाणात काजू बीची आयात होते. या मालाला काजू प्रक्रिया युनिटधारकांकडून मोठी मागणी आहे. याचा परिमाण स्थानिक काजू बी विक्रीवर झाला. स्थानिक मालाचा उठाव कमी झाला आहे. दरही प्रतिकिलो ११० रुपये इतका स्थिर आहे.
- अक्षय बिल्ले, काजू व्यापारी, आजरा


इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...