agriculture news in marathi, local potato arrival decrease in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत स्थानिक नव्या बटाट्याची आवक घटली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पुणे  ः पावसामुळे बटाट्याचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड या तालुक्यांतील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. परिणामी बाजारपेठेतील स्थानिक नवीन बटाट्याची आवक ५० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यामुळे बटाट्याची बाजारपेठ ही आग्रा आणि इंदौर येथील आवकेवर अवलंबून असून, आवकेअभावी स्थानिक बटाट्याचे दर वाढले असल्याची माहिती पुणे बाजार समितीमधील बटाट्याचे प्रमुख अडतदार राजेंद्र कोरपे यांनी दिली. 

पुणे  ः पावसामुळे बटाट्याचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड या तालुक्यांतील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. परिणामी बाजारपेठेतील स्थानिक नवीन बटाट्याची आवक ५० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यामुळे बटाट्याची बाजारपेठ ही आग्रा आणि इंदौर येथील आवकेवर अवलंबून असून, आवकेअभावी स्थानिक बटाट्याचे दर वाढले असल्याची माहिती पुणे बाजार समितीमधील बटाट्याचे प्रमुख अडतदार राजेंद्र कोरपे यांनी दिली. 

श्री. कोरपे म्हणाले, की पुणे बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक ही प्रामुख्याने आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून होत असते. सध्या बाजारात आग्रा, इंदौर येथील शीतगृहातील बटाट्याची आवक सुरू आहे. शीतगृहातील साठा संपत आला असून, फार कमी साठा असलेली शीतगृहे चालविणे शक्य नसल्याने शीतगृह चालकांनी तातडीने बटाटा बाजारपेठेमध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजार समितीमधील आवक वाढली आहे.

स्थानिक आवकेमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड आणि काही प्रमाणात जुन्नर तालुक्यातून बटाट्याची आवक होत आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील बटाट्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र अतिवृष्टीमुळे बटाट्याची काढणी लांबली. परिणामी बटाटा शेतातच सडण्याचे आणि भिजण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. त्यातच जास्त काळ बटाटा भिजल्याने दर्जा घसरला आहे. यामुळे चांगल्या बटाट्याला चांगले दर मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातून या हंगामात साधारण दररोज १०० टनांची आवक होत असते. मात्र सध्या केवळ ३० ते ४० टन आवक होत असून, १२ ते १६ रुपये किलो असे दर मिळत आहे. सध्या इंदौर येथून सुमारे १०० टन; तर आग्रा येथून १ हजार टन बटाटा आवक होत असून, अनुक्रमे दर १७ ते २० आणि १० ते १५ रुपये प्रतिकिलो आहेत. 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मिरचीला दराचा तडकाअकोला ः हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळी दिवशीही... कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा झेंडू...
जळगावात झेंडूच्या बाजारात तेजीजळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी...
नाशिकमधील झेंडू उत्पादकांचा थेट...नाशिक : चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला परतीचा...
नगरमध्ये शेवंतीची फुले चारशे रुपये किलो नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे...
औरंगाबादमध्ये झेंडू सरासरी ६५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १००० ते कमाल २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला...
राज्यात गवार १५०० ते ७००० रुपये...पुण्यात ५००० ते ७००० रुपये दर पुणे ः...