स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त होणार नाहीत

कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होणार नाहीत, अशी ठाम भूमिका ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी घेतली. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त होणार नाहीत Of local self-governing bodies Elections will not be held immediately
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त होणार नाहीत Of local self-governing bodies Elections will not be held immediately

नागपूर : कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होणार नाहीत, अशी ठाम भूमिका ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी घेतली. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपच्या नेत्यांनी बैठक घेत २६ जुलैला चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला. या बाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ‘‘हे आंदोलन म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे. आम्ही तर ओबीसी परिषदेमध्ये सर्व प्रमुख नेत्यांना बोलावले आहे. त्यात भाजपच्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सेनेचे नेते संजय राठोड, अनेक आमदार-खासदार, विविध संघटनेच्या पदाधिकारी, विविध क्षेत्रात ओबीसींचा अभ्यास करणारे देखील यामध्ये सहभागी होणार  आहेत.’’  ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचाही पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोक्यात आले आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार व पालघर या सहा जिल्हा परिषदेतील निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. न्यायालयाने आयोग नेमून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितला आहे. मात्र, केंद्र सरकारला दोनदा मागणी करूनही हा डेटा दिला नसल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com