Agriculture news in marathi Of local self-governing bodies Elections will not be held immediately | Page 3 ||| Agrowon

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त होणार नाहीत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होणार नाहीत, अशी ठाम भूमिका ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी घेतली. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर : कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होणार नाहीत, अशी ठाम भूमिका ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी घेतली. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपच्या नेत्यांनी बैठक घेत २६ जुलैला चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला. या बाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ‘‘हे आंदोलन म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे. आम्ही तर ओबीसी परिषदेमध्ये सर्व प्रमुख नेत्यांना बोलावले आहे. त्यात भाजपच्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सेनेचे नेते संजय राठोड, अनेक आमदार-खासदार, विविध संघटनेच्या पदाधिकारी, विविध क्षेत्रात ओबीसींचा अभ्यास करणारे देखील यामध्ये सहभागी होणार 
आहेत.’’ 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचाही पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोक्यात आले आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार व पालघर या सहा जिल्हा परिषदेतील निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. न्यायालयाने आयोग नेमून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितला आहे. मात्र, केंद्र सरकारला दोनदा मागणी करूनही हा डेटा दिला नसल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला.
 


इतर बातम्या
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...